Posts

वेस्ट डिकंपोजरमधील सूक्ष्म जिवाणू" |

Image
वेस्ट डिकंपोजरमधील सूक्ष्म जिवाणू" | Microbes in Waste Decomposers"   वेस्ट डिकंपोजरमधील सूक्ष्म जिवाणू"* वेस्ट डिकंपोजर"मध्ये चार मुख्य प्रकारचे सूक्ष्म जीवाणू आहेत. 1) Cellulose degrading Bacteria 2) Xylan degrading Bacteria 3) Phosphorus solubilizing Bacteria (PSB) 4) Potash solubilizing Bacteria (KSB) 1) *Cellulose degrading Bacteria:-* Cellulose (सेल्युलोज) म्हणजे कुठल्याही सेंद्रीय पदार्थातील मुख्य घटक. याला degrade करणारे म्हणजेच सडवणारे किंवा कुजवणारे सूक्ष्म जीवाणू. म्हणजेच लाकडा पासुन किंवा टाकावू पदार्था पासून कार्बन विलग करणारा जिवाणू. हा जिवाणू औद्योगिक वापरात खुपच मोठ्या प्रमाणात सडवन्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात वापरला जातो. तेंव्हा सहाजीकच याच जिवाणूची तीव्रता या कल्चर मध्ये सर्वात जास्त आहे. त्यामुळे याचा वापर कीड नियंत्रणासाठी ही करता येते. वेस्ट डि कंपोजर मधिल याच जिवाणूच्या फवारणीने किडींची मेणयुक्त (wax) त्वचा रखरखीत करून त्यांचा उत्कृष्ट परीणाम सोबतच्या साधारण विषाणे (औषधी) मिळवणे सहज शक्य आहे. परंतु, पिकास जमीनीतूनही बरेच काही ...

मित्रकीटक शेतीसाठी कसे फायदेशीर आहेत?

Image
   मित्रकीटक शेतीसाठी कसे फायदेशीर आहेत? उत्तर:- शेती करत असताना शेतकऱ्याला पिकामध्ये बऱ्याच प्रकारच्या किडी दिसतात.काही किटक हे पिकाचे नुकसान करणारे असतात तर काही कीटक हे पिकाचे नुकसान करणाऱ्या किडींवर जगणारे असतात. पण शेतकरी पिकामध्ये कोणतेही जरी कीटक दिसले तरी शेतकऱ्याला ती कीड पिकाचे नुकसान करणारी आहे असे वाटून बरेच शेतकरी लगेचच रासायनिक औषध आणून फवारणी करतात आणि अनावश्यक खर्च वाढवला जातो.     सध्या शेतकऱ्याला दुसऱ्यांच्या सल्ल्यानुसार नाही तर स्वतः त्यामधील अभ्यास करणे गरजेचे आहे म्हणजेच काय तर सध्या शेतात कोणते पीक आहे, त्या पिकामध्ये येणारी कीड कोणती? ती पिकासाठी किती हानिकारक आहे? नियंत्रणासाठी कोणत्या उपाययोजना करायला हव्या? या गोष्टी माहित असणे गरजेचे आहे.   पिकामध्ये दिसणाऱ्या सर्व किडी या पिकाचे नुकसान करणाऱ्या नसतात. बऱ्याच वेळेला काही किडी या दुसऱ्या किडीला खाताना पाहायला मिळतात, म्हणजेच काय तर नुकसानकारक कीड जशी आपल्याला पिकामध्ये पाहायला मिळते त्याच प्रमाणे नैसर्गिक रित्या कीड नियंत्रणाचे काम होताना आपल्याला पाहायला मिळते.  ...

सुत्रकृमीमुळे पिकाचे कश्या प्रकारे नुकसान होते?

Image
        सुत्रकृमीमुळे पिकाचे कश्या प्रकारे नुकसान होते? *सूत्रकृमी(निमेटोड्स):-*    हा पिकांचे नुकसान करणारा अतिसूक्ष्म धाग्यासारखा लांबट जीव असून त्याची सरासरी लांबी ०२ ते ०.५ मि.मी. असते. तो डोळ्यांनी दिसत नाही. त्याला जगण्यासाठी प्रामुख्याने ओलावा व पिकांची जरुरी असते. जमिनीतील मातीच्या कणांच्या पोकळीत त्याचे वास्तव्य असते. तो जमिनीत अगर झाडांची मुळे जमिनीलगत खोडाच्या अंतर्गत भागात राहून नुकसान करतो. महाराष्ट्रात निरनिराळ्या पिकांवर सुमारे ७५ प्रकारच्या सुत्रकृमींचा प्रादुर्भाव होत असल्याचे आढळून आले आहे. त्यापैकी पिकांच्या मुळांवर गाठी करणारी(रूट नॉट),सिस्ट निमेटोड्स,रूट लेशन निमेटोड्स,रॅडोफोलस व डँगर या सूत्रकृमींच्या महत्त्वाच्या प्रजाती आहेत. *लक्षणे:-* * सुत्रकृमीचा प्रादुर्भाव पिकास मुळाद्वारे होतो. * मुळांच्या तंतूमध्ये तोंड खुपसून त्यामधील अन्नद्रव्ये घ्यायला चालू करतात.त्यामुळे मुळावर गाठी तयार व्हायला चालू होतात. * पिकाची वाढ कमी होते वाढ खुंटते, अन्नद्रव्यांची कमतरता दिसु लागते. * अन्नद्रव्ये पूर्णपणे लागू होत नाहीत.पिक पोषणास अन्न...

पिकाचे तुम्हाला माहिती असलेले रोग प्रतिरोधक वाण कोणते आहेत?

Image
  पिकाचे तुम्हाला माहिती असलेले रोग प्रतिरोधक वाण कोणते आहेत?  महाराष्ट्रामध्ये वेगवेगळा भाजीपाला कमी अधिक प्रमाणात सर्व भागामध्ये पिकवला जातो. त्यामध्ये सर्व हंगामामध्ये भेंडीचे पीक घेतले जाते.कोणत्याही पिकाचे चांगले उत्पन्न मिळण्यासाठी कीड आणि रोग व्यवस्थापन खूप महत्वाचे आहे.त्यामध्ये रोग प्रतिबंधक कीड प्रतिबंधक वाण वापरल्यास नक्कीच चांगल्या पद्धतीने कीड आणि रोगापासून पिकाचे संरक्षण आणि चांगले उत्पन्न नक्की मिळू शकते.  *भेंडी पिकाचे रोग प्रतिरोधक वाण:-* *फुले विमुक्त:-* येलो व्हेन मोझॅक विषाणू रोग प्रतिरोधक भेंडी जातीची फुले विमुक्ताची शिफारस केली जाते.आकर्षक हिरव्या रंगाची फळे, चमकदार,पिवळ्या शिरा मोज़ेक विषाणू रोगास प्रतिरोधक, पांढऱ्या माशी, जॅसिड्स आणि फळ पोखरणाऱ्या अळीस सहनशील हा वाण आहे.  *पुसा सावनी:-*  आय.ए. आर.आय विकसित या जातीची फ़ळे १०-१५ से.मी लांब हिरवी मुलायम झाडावर काटेरी लव देठावर तांबूस छटा फुले पिवळी व प्रत्येक पाकळीवर पिवळा ठिपका,सुरुवातीला येलो मोझॅक व्हायरस रोगास प्रतिकारक परंतु सद्या व्हायरस रोगास बळी पडते. हेक्टरी ८-१० टन उत्पा...

कांदा पिकामध्ये कोणते रोग दिसून येतात?

Image
  कांदा पिकामध्ये कोणते रोग दिसून येतात? कांदा पिक हे महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये जास्त प्रमाणात तर काही भागात कमी प्रमाणात घेतले जाते.पण इतर पिकाप्रमाणे या पिकामध्येहि वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव होतो. कांदा पिकावर प्रामुख्याने मर, काळा करपा, पांढरी सड, मूळकूज, सूत्रकृमी, तपकिरी करपा, केवडा, मानकूज, काळी बुरशी, निळी बुरशी, विटकरी सड, काजळी आदी रोग पडतात. *मररोग:-* हा रोग स्क्लेरोशियम रॉल्फसी नावाच्या बुरशीमुळे होतो. यामुळे रोपे पिवळी पडतात. जमिनीलगतच्या रोपांचा भाग मऊ पडतो आणि रोपे कोलमडतात व नंतर सुकतात. या रोगामुळे रोपांचे 10 ते 90 टक्के नुकसान होते. खरीप हंगामातील हवामान या रोगास अनुकूल असते. अधिक आर्द्रता व 24 ते 30 अंश सें. तापमान या रोगाच्या बुरशीच्या वाढीस उपयुक्त ठरते. *पांढरी सड:-* हा रोग स्क्लोरोशियम रॉल्फसी या बुरशीमुळे होतो. ही बुरशी पुर्नलागण केलेल्या रोपांच्या मुळावर वाढते. रोपांची किंवा झाडांची पाने जमिनीलगत सडतात. पानांचा वरचा भाग पिवळा पडतो. वाढणार्‍या कांद्याला मुळे राहत नाहीत. कांद्यावर कापसाप्रमाणे बुरशी वाढते. त्यावर पांढरे दाणे तयार होतात. ...

ऊसामध्ये कोणती आंतरपिके घ्यावीत ?

Image
  ऊसामध्ये कोणती आंतरपिके घ्यावीत? सुरू उसाची लागवड १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी पर्यंत केली जाते. भाजीपाल्याची, वेलवर्गीय पिके, कडधान्याची, तेलबियाची, कंदवर्गीय, हिरवळीच्या खतांची आंतरपिके घ्यावीत. *ऊस + भाजीपाला लागवड पद्धत:-* भारी जमिनीत ४.५ फूट किंवा ६ फूट अंतरावर उसाची लागण सरीमध्ये केल्यानंतर दुसरे पाणी (आंबवणी) देण्याच्या अगोदर वरंब्याच्या बगलेत आंतरपिकाची टोकन पद्धतीने लागण करावी. नवलकोल, ब्रोकोली, पानकोबी व फुलकोबी रोपे लागण सरीच्या शिगेवर करावी. *ऊस + भुईमूग आंतरपीक:-* भुईमुगाची टोकणी ऊस लागण झाल्यानंतर ५ ते ६ दिवसांनी म्हणजे जमीन वाफश्यावर असताना सरीच्या एका बगलेस करावी. भुईमुगाच्या दोन रोपात १० सें.मी. अंतर ठेवून एका ठिकाणी एकच बी टोकावे. भुईमूग या आंतरपिकास ऊस पिकाव्यतिरिक्त भुईमुगाच्या क्षेत्रानुसार हेक्टरी २५ किलो नत्र व ५० किलो स्फुरद या प्रमाणात द्यावे. भुईमूग या आंतरपिकापासून हेक्टरी ९ ते ११ क्विंटल वाळलेली शेंग मिळते. *ऊस + कांदा:-* उसामध्ये कांद्याच्या रोपांची लागण सरीच्या दोन्ही बाजूस १० ते १५ सें.मी. अंतरावर ऊस लागण केल्यानंतर ५ ते ६ दिवसांनी करावी....

तुम्हाला कोणती सापळा पिके माहित आहेत? ती कोणत्या किडीच्या नियंत्रणासाठी मदत करतात?

Image
  तुम्हाला कोणती सापळा पिके माहित आहेत? ती कोणत्या किडीच्या नियंत्रणासाठी मदत करतात? उत्तर:- एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या पद्धतीने कीड नियंत्रण करण्याच्या विविध घटकांपैकी सापळा पीक उपयुक्त पद्धत आहे. सापळा पिकाचा कीड व्यवस्थापनामध्ये वापर केल्यास निसर्गाचा समतोल राखून कीड आर्थिक नुकसान पातळी खाली रोखता येते.    सापळा पिके हा एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीमधील महत्त्वाचा घटक आहे. मुख्य पिकाचे हानिकारक किडीपासून संरक्षण करण्यासाठी हंगामानुसार किडींना जास्त बळी पडणारे दुसरे पीक मुख्य पिकासोबत लावल्यास कीड त्या पिकाकडे आकर्षित होते. यामुळे मुख्य पिकाचे संरक्षण होते. सापळा पीक लावल्यामुळे रासायनिक कीटकनाशक फवारणीवर होणारा खर्च कमी होतो. मित्र किडींची संख्या संतुलित राहण्यास मदत होते. या सोबतच सापळा पिकापासून अतिरिक्त उत्पन्न मिळते. पर्यावरणाचे संवर्धन होते. मुख्य पिकाच्या उत्पादन वाढीसाठी फायदा होतो. भाजीपाला आणि फळपिकामध्ये सापळा पिकाचा उपयोग अतिशय उपयुक्त आहे. *कोणत्या सापळा पिकांकडे कोणती कीड आकर्षित होते?* * एरंडी या सापळा पिकाची एक ओळ मुख्य पिकाच्या कडेने लावल...