Mid-Career Professional Development Training on Advancing Agricultural Extension Report
प्रशिक्षण अहवाल प्रशिक्षणाचे नाव :- Mid-Career Professional Development Training on Advancing Agricultural Extension प्रशिक्षण कालावधी :- २० जुलै २०२६ ते २४ जुलै २०२६ (०५ दिवस) प्रशिक्षण स्थळ :- National Institute of Agricultural Extension Management (MANAGE), राजेंद्रनगर , हैदराबाद सहभागी श्री. अमितकुमार बालाजीराव मेहञे वरिष्ठ कृषी विस्तार अधिकारी AFARM, पुणे प्रस्तावना भारतीय कृषी क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. हवामान बदलाचे वाढते परिणाम , नैसर्गिक संसाधनांची घट , बदलती बाजारपेठ , आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर , कृत्रिम बुद्धिमत्ता ( Artificial Intelligence), डिजिटल कृषी , अचूक शेती ( Precision Farming), ई-गव्हर्नन्स , कृषी उद्योजकता , मूल्यसाखळी विकास ( Value Chain Development) आणि शेतकरी उत्पादक कंपन्या ( Farmer Producer Organizations - FPOs) यांसारख्या संकल्पनांमुळे कृष...