मित्रकीटक शेतीसाठी कसे फायदेशीर आहेत?
मित्रकीटक शेतीसाठी कसे फायदेशीर आहेत? उत्तर:- शेती करत असताना शेतकऱ्याला पिकामध्ये बऱ्याच प्रकारच्या किडी दिसतात.काही किटक हे पिकाचे नुकसान करणारे असतात तर काही कीटक हे पिकाचे नुकसान करणाऱ्या किडींवर जगणारे असतात. पण शेतकरी पिकामध्ये कोणतेही जरी कीटक दिसले तरी शेतकऱ्याला ती कीड पिकाचे नुकसान करणारी आहे असे वाटून बरेच शेतकरी लगेचच रासायनिक औषध आणून फवारणी करतात आणि अनावश्यक खर्च वाढवला जातो. सध्या शेतकऱ्याला दुसऱ्यांच्या सल्ल्यानुसार नाही तर स्वतः त्यामधील अभ्यास करणे गरजेचे आहे म्हणजेच काय तर सध्या शेतात कोणते पीक आहे, त्या पिकामध्ये येणारी कीड कोणती? ती पिकासाठी किती हानिकारक आहे? नियंत्रणासाठी कोणत्या उपाययोजना करायला हव्या? या गोष्टी माहित असणे गरजेचे आहे. पिकामध्ये दिसणाऱ्या सर्व किडी या पिकाचे नुकसान करणाऱ्या नसतात. बऱ्याच वेळेला काही किडी या दुसऱ्या किडीला खाताना पाहायला मिळतात, म्हणजेच काय तर नुकसानकारक कीड जशी आपल्याला पिकामध्ये पाहायला मिळते त्याच प्रमाणे नैसर्गिक रित्या कीड नियंत्रणाचे काम होताना आपल्याला पाहायला मिळते. ...