Posts

Showing posts with the label शेतीची कामे

शेतीचे कामे

Image
  शेतजमिनीची मशागत, पेरणी किंवा लावणी, आंतर मशागत, मळणी, औषध फवारणी, सिंचन, बीजप्रकिया इ. कामे म्हणजे शेतीची कामे होत. पिकाच्या निकोप आणि उत्तम वाढीसाठी जमीन चांगली तयार करणे नितांत गरजेचे असते. जमिनीचा वरचा थर, ज्यामध्ये खऱ्या अर्थाने पीक वाढते, तो थर हलवून भुसभुशीत करणे, त्यातील तणासारखा भाग काढून टाकणे, जमिनीत पीक पेरणे, पिकांत आंतर मशागत करून वाढीला पोषक वातावरण निर्माण करणे इ. कामे योग्य प्रकारे केली तर पीक जोमदार येऊन उत्पादनही चांगले येते. यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व शेतकामांना ‘ मशागत ’ म्हणतात. मशागतीने जमिनीचे थर खालीवर होतात. जमीन भुसभुशीत व रवाळ होते. तसेच पावसाचे पाणी वरून वाहून न जाता ते जास्त प्रमाणात जमिनीत मुरते आणि जमिनीत ओलावा साठून राहतो. मशागतीमुळे तणांचा प्रादुर्भाव कमी होतो, खत चांगल्या प्रकारे जमिनीत मिसळते आणि कीटकांना व कवकीय रोगांना आळा बसतो. जमिनीत हवा खेळती राहून ती पिकांनापोषक ठरते. जमिनीत रासायनिक किया जास्त चांगल्या प्रकारे होऊन जमिनीतील पोषक अन्नद्रव्ये पिकाला उपलब्ध होतात. पिकाची उगवण आणि वाढ चांगली होऊन उत्पन्नात वाढ होते. मशागतीचे पूर्वमशागत, ...