ऊसामध्ये कोणती आंतरपिके घ्यावीत ?
ऊसामध्ये कोणती आंतरपिके घ्यावीत? सुरू उसाची लागवड १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी पर्यंत केली जाते. भाजीपाल्याची, वेलवर्गीय पिके, कडधान्याची, तेलबियाची, कंदवर्गीय, हिरवळीच्या खतांची आंतरपिके घ्यावीत. *ऊस + भाजीपाला लागवड पद्धत:-* भारी जमिनीत ४.५ फूट किंवा ६ फूट अंतरावर उसाची लागण सरीमध्ये केल्यानंतर दुसरे पाणी (आंबवणी) देण्याच्या अगोदर वरंब्याच्या बगलेत आंतरपिकाची टोकन पद्धतीने लागण करावी. नवलकोल, ब्रोकोली, पानकोबी व फुलकोबी रोपे लागण सरीच्या शिगेवर करावी. *ऊस + भुईमूग आंतरपीक:-* भुईमुगाची टोकणी ऊस लागण झाल्यानंतर ५ ते ६ दिवसांनी म्हणजे जमीन वाफश्यावर असताना सरीच्या एका बगलेस करावी. भुईमुगाच्या दोन रोपात १० सें.मी. अंतर ठेवून एका ठिकाणी एकच बी टोकावे. भुईमूग या आंतरपिकास ऊस पिकाव्यतिरिक्त भुईमुगाच्या क्षेत्रानुसार हेक्टरी २५ किलो नत्र व ५० किलो स्फुरद या प्रमाणात द्यावे. भुईमूग या आंतरपिकापासून हेक्टरी ९ ते ११ क्विंटल वाळलेली शेंग मिळते. *ऊस + कांदा:-* उसामध्ये कांद्याच्या रोपांची लागण सरीच्या दोन्ही बाजूस १० ते १५ सें.मी. अंतरावर ऊस लागण केल्यानंतर ५ ते ६ दिवसांनी करावी....