माती परिक्षण काळाची गरज - ABM
माती परीक्षण काळाची गरज - ABM माती परीक्षणामुळे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण समजते. त्यानुसार खतांचा पुरवठा करणे सोपे जाते. खारपट व चोपण जमिनी सुधारण्यासाठी माती परीक्षणाचा फायदा होतो. तसेच पिकांच्या वाढीस आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचा समतोल राखता येतो. शेतजमिनीतील प्रातिनिधिक माती नमुना काढून प्रयोगशाळेत रासायनिक पृथक्करण करून घेणे म्हणजे ‘माती परीक्षण’ होय. यात प्रामुख्याने मातीतील मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचे प्रमाण तपासले जाते. त्यानुसार पिकांचे आणि खतांचे नियोजन करणे गरजेचे असते. माती परीक्षणामुळे पिकांना द्यावयाच्या खतांची मात्रा ठरविता येते. माती परीक्षणासाठी जागा कशी निवडावी पिके काढल्यानंतर किंवा पेरणीपूर्वी तसेच रासायनिक खते देण्यापूर्वी किंवा खते दिल्यानंतर ३ महिन्यांनी मातीचा नमुना घ्यावा. मातीचा रंग, जमिनीचा खडकाळपणा, उंच-सखलपणा, बागायत किंवा जिरायत स्थिती लक्षात घेऊन शेतीचे वेगवेगळे भाग पाडावेत. प्रत्येक भागाला विशिष्ट क्रमांक द्यावा. जनावरे बसण्याची, झाडाखालील, कचरा टाकण्याची जागा, पाणी साचून राहण्याची किं...