मातीचे आरोग्य - माती परीक्षण


  माती परीक्षणानुसार खतांची शिफारस

अन्नद्रव्यांचे प्रमाण

उपलब्ध अन्नद्रवे (कि/हे)

शिफारस

नत्र

स्फुरद

पालाश

अत्यंत कमी

< १४०

< ७

<१००

शिफारसीत मात्रे पेक्षा ५० टक्के जास्त

कमी

१४१-२८०

८-१४

१०१-१५०

शिफारसीत मात्रे पेक्षा २५ टक्के जास्त

मध्यम

२८१-४२०

१५-२१

१५१-२००

शिफारसीत मात्रा

थोडे जास्त

४२१-५६०

२२-२८

२०१-२५०

शिफारसीत मात्रा

जास्त

५६१-७००

२९-३५

२५१-३००

शिफारसीत मात्रे पेक्षा २५ टक्के कमी

अत्यंत जास्त

>७००

> ३५

>३००

शिफारसीत मात्रे पेक्षा ५० टक्के कमी

 



भारतातील रासायनिक खतांच्या अन्नद्रव्यांची जमिनीतील कार्यक्षमता

अन्नद्रव्य

कार्यक्षमता %

नत्र

३०-४० %

स्फुरद

१५-२० %

पालाश

७०-८० %

जस्त

२-५ %

लोह

१-२ %

तांबे

१-२ %

 

 उथळ जमिन

२५ सें.मी. पर्यंत खोल जमिनी

उथळ जमिनीच्या वर्गात मोडतात.

वाळूंचे प्रमाण जास्त

सुपीकता कमी

जलधारणा शक्ती कमी

पिकांसाठी आर्थिकदृष्ट्या न परवडणाऱ्या

गवते,वनकुरनीय शेती, कोरडवाहू फळझाडे,आंतर पिकांसाठी उपयुक्त. अखाद्य तेलबिया झाडे.

मृद व जलसंधरणाच्या कार्यक्रमाला अग्रक्रम आवश्यक सीसीटी,शेततळे,नालाबंडीग,बांधबंधीस्तीइ. मार्गाने पाणी आडवणे.


 


 मध्यम खोल जमिन

२५-५० सें.मी. पर्यंत खोल जमिनी

चिकन मातीचे प्रमाण थोडे जास्त

खोली वाढेल तशी सुपीकतेत वाढ

जलधारणा शक्ती मध्यम.

विशेषतः उत्तर मध्य महाराष्ट्रात खरीप पिकासाठी उपयुक्त

आंतरपिक पद्धतीची शिफारस

बाजरी, सुर्यफुल, तुर व त्यांच्या आंतरपिकास उपयुक्त.

 

५०- १००  सें.मी. पर्यंत खोल जमिनी

चिकन मातीचे प्रमाण जास्त

सुपीकता चांगली

चुनखडीचे प्रमाण जास्त

नत्र,स्फुरद कमी,पालाश चे प्रमाण जास्त

गंधक,लोह, आणि जस्त ची कमतरता

जलधारणा शक्ती मध्यम

पावसाच्या अनुकुलतेत दुबार पिक पद्धती शक्य

रबी पिकासाठी चांगल्या (ज्वारी,करडई,सुर्यफुल,हरभरा)


 




 माती परीक्षण

 

माती परीक्षण म्हणजे काय

माती परीक्षण म्हणजे शेतातील मातीच्या नमुन्यातील प्रामुख्याने रासायनिक पृथ:करण करून त्यातील उपलब्ध मुख्य,दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण तपासणे होय. आवश्यक असल्यास जमिनीच्या भोतिक व जैविक गुणधर्माची तपासणी सुध्दा केली जाते.

v माती परीक्षणाचे महत्त्व

  •  माती परीक्षणानुसार खतांचा वापर केल्यामुळे अन्नद्रव्यांच्या संतुलित पुरवठा करता येतो.खतांचा असंतुलित वापर कमी होतो.
  • अन्नद्रव्यांच्या जमिनीतील उपलब्धतेनुसार खतांची मात्रा ठरविता येते.
  • सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता त्यांचा वापर करणे शक्य होते. आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा अवास्तव वापर टळतो.
  • संतुलित  अन्नद्रव्यांचा वापर केल्यास उत्पन्न तर वाढतेच परंतु अन्नद्रव्यांच्या खर्चात बचत  झाल्याने अधिक फायदाही होतो.
  • जमिनीत आम्लता , विम्लता व क्षार यांचे मूल्यमापन करून पिक योग्य अशी जमिन तयार करता येते.

 

vमातीचा नमुना घेताना घ्यावयाची काळजी

  • उन्हाळी हंगाम मातीचा नमुना घेण्यासाठी योग्य  काळ आहे. मातीचा नमुना पिकांची कापणी झाल्यावर तसेच किंवा नांगरणीपूर्वी घ्यावा.
  • जमिनीवर पिक असताना मातीचा नमुना घ्यायचा असेल तर खते दिल्यानंतर दोन महिन्यांनी पिकांच्या ओळीमधून घ्यावा.
  • भाजीपाला व नगदी पिकासाठी दोन वर्षातून एकदा मातीचा नमुना घेऊन तपासणी करणे गरजेचे आहे.
  • शेतातील गुरे ढोरे बसण्याची जागा, खत व कचरा टाकण्याची जागा, विहिरीचे व शेतातील बांधकाम,इ. जागेतून नमुना घेऊ नये.
  • रासायनिक खतांच्या पिशव्या नमुन्यासाठी वापरू नये किंवा त्या पिशव्या जवळ ठेऊ नये.
  • झाडाखाली किंवा पाणथळ जागेतील तसेच माती वाहून गेलेल्या जागेतील नमुना घेऊ नये.
  • सूक्ष्म अन्नद्रव्ये तपासणी करावयाची असल्यास लोखंडी अथवा धातूची हत्यारे वापरू नये.

v मातीचा नमुना कसा घ्यावा

  • मातीचा नमुना घेण्यापूर्वी जमिनीचा रंग,खोली,उतार आणि पिक पद्धती नुसार विभाग करून प्रत्येक विभागातून एक प्रातिनिधिक  नमुना परीक्षणासाठी घ्यावा.
  • मातीचा नमुना घेण्यासाठी गोणपाट,कापडी पिशव्या,घमेले इ. साहित्य असावेत.
  • मातीचा प्रातिनिधिक नमुना घेण्यासाठी शेतातील प्रत्येक विभागातून १५ ते २० ठिकाणची माती चे नमुने नागमोडी पद्धतीने घ्यावेत व त्यापासून एक प्रातिनिधिक नमुना तयार करावा.

                               

  • खड्ड्याच्या एका बाजूला सारख्या २ सेंटीमीटर जाडीची माती खुरपीणे वरपासून तर खाली पर्यंत खरडून एका घमेल्यात काढावी.
  • एकजीव केलेली माती गोणपाटावर टाकून त्यांचे चार समान भाग करावेत.


  • समोरासमोरील दोन भाग (१ व ३ ) काढून पुन्हा राहिलेल्या माती (२ व ४ ) पुन्हा एकत्रित करून त्यांचे समान चार भाग करावे.

 अशा तऱ्हेने अंदाजे अर्धा किलो मातीचा  प्रातिनिधिकनमुना एका कापडी पिशवी मध्ये भरून द्यावा.




  • सोबतच एका कागदावर पुढील खालील माहिती शेतकऱ्यांनी लिहून माती तपासणी साठी प्रयोग शाळेत पाठवावी.

 vशेतकऱ्यांनी मातीच्या नमुन्यासोबत खालील माहिती भरून घ्यावी.

  • शेतकऱ्यांचे नाव :-
  • फोन/मोबाईल नं.
  • गट नंबर / सर्व्हे नं.
  • बागायत/ कोरडवाहू
  • जमिनीचा निचरा
  • जमिनीचा प्रकार
  • जमिनीची खोली
  • नमुना घेतल्याची तारीख
  • मागील हंगामात घेतलेले पिक  व त्यांचे उत्पादन
  • वापरलेली खते व त्यांचे प्रमाण
  • पुढील हंगामात घ्यावयाची पिक   





 कृपया आमच्या अल्पखर्चिक शेती by ABM   या लिंक वर क्लिक करून अल्पखर्चिक शेती By ABM या युटूब पेज ला आवश्य भेट द्या.

आपल्याला माती परीक्षणा संदर्भात आमचा व्हिडीओ पाहावयाचा असल्यास माती परीक्षण :- माती परिक्षण व्हिडिओ


धन्यवाद !!!
अमितकुमार बालाजीराव मेहत्रे
मो. ९६५७८५८१८०

Comments

Popular posts from this blog

🌧️ खरीपाच्या तयारीसाठी बिजप्रक्रियेची वेळ आलीय!

बैलगाडी शर्यत

तुम्हाला कोणती सापळा पिके माहित आहेत? ती कोणत्या किडीच्या नियंत्रणासाठी मदत करतात?